मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे..आता सरकारकडूनही या योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे.लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारीशक्ती अॅपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी गेल्या 2 दिवसांत तब्बल 1 कोटी 5 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे, सरकारकडून आता योजनेच्या पुढील टप्पा सुरुवात झाली आहे. 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये जमा होणार आहे. महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. मोठी बातमी
Free Flour Mill Scheme 2024 महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, योजना विषयी माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी अंतिम टप्प्यात आहे, आणि सरकारने 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व पात्र महिलाच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अर्जांची छाननी अंतिम टप्प्यात असून, 16 आणि 17 ऑगस्ट रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी आज काही महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया जमा करण्यात आला, घाबरुन जाण्याचं कारण नाही. आणि उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत. ही केवळ तांत्रिक पडताळणी असून, गैरसमज किंवा अपप्रचार टाळण्याची विनंती करण्यात येत आहे.अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केली आहे.ही माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरुन दिली.
लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची चाचणी यशस्वी !
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून १६ व १७ ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे.
ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 8, 2024
मा. अजित पवारांनी दिंडोरीत भाषणात असे सांगितले की, “माझी लाडकी बहीण” योजना ग्रामीण भागातील महिलांच्या आशा आणि अपेक्षांसाठी अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे. गावोगावी ही योजना पोहोचली आहे,
आणि कोणतेही महिलेचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही, असा दादा अजित पवारांचा वादा आहे. त्यांनी कालच 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून मी महिलांच्या पाठीशी उभा राहात आहे. असे मा.अजित पवारांनी दिंडोरीत भाषणात सांगितले आहे.