Ladka Bhau Yojana २०२४; लाडका भाऊ योजना; अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता, योजनाचे वैशिष्ट्ये

Table of Contents

Ladka Bhau Yojana; लाडका भाऊ योजना;अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता, योजनाचे वैशिष्ट्ये

लाडली बहना योजनेच्या नंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार मुलांसाठी लाडका भाऊ योजना सुरू केली. या विषयी घोषणा 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. महाराष्ट्र सरकारने तरुणांना मदत करण्यासाठी लाडका भाऊ योजना 2024 हा कार्यक्रम सुरू केला आहे. याद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा पैसे मिळणार आहेत. बेरोजगारीतून बाहेर पडण्यासाठी तरुणांना लाडका भाऊ योजना 2024 अंतर्गत आर्थिक मदत मिळेल . विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या आहे. योजना आणि त्याची पात्रता, लागणारे कागदपत्रे, वैशिष्ट्ये याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ही न्यूज वाचत रहा.

 

  • योजना घोषणा केल्याची तारीख

लाडका भाऊ ही योजना 17 जुलै रोजी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती.

 

Ladka Bhau Yojana २०२४ लाडका भाऊ योजना; अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता, योजनाचे वैशिष्ट्ये
Ladka Bhau Yojana २०२४ लाडका भाऊ योजना; अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता, योजनाचे वैशिष्ट्ये.

 

  • लाडका भाऊ योजनेची वैशिष्टे
  1. नोकरी करण्याचा कालावधी 6 महिने असेल.
  2. तसेच उमेदवारांना सरकार द्वारे प्रमाणपत्र मिळेल.
  3. पैसे थेट अर्जदारच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
  4. या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक वर्षी १० लाख उमेदवारांना संधी उपलब्ध होईल.
  5. पात्र आणि रोजगार इच्छुक उमदेवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता .
  6. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमाांक- 1800 120 8040 वर संपर्क करा.

 

  • उमेदवारांना सरकार द्वारे मदत
  क्र.  लाडका भाऊ योजनेची शैक्षणिक पात्रता  प्रति महिना स्टायपेंड
  1)  12 वी पास  ६,०००/-
  2)  आयटीआय / डिप्लोमा  ८,०००/-
  3)   ग्रॅजुएशन / पोस्ट ग्रॅजुएशन  १०,०००/-

 

  • लाडका भाऊ योजनेची पात्रता
  1. लाडका भाऊ योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे आणि त्यांनी बारावी पास , आयटीआय, ग्रॅजुएशन किंवा पोस्ट ग्रॅजुएशन शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  2. या कार्यक्रमासाठी फक्त राज्यातील बेरोजगार मुलेच पात्र असतील.
  3. योजनेचा लाभ शिक्षण चालू असणाऱ्यांना मिळणार नाही.
  4. उमेदवार महाराष्ट्राचा राहणाऱ्या असावा.
  5. त्याची आधार नोंदणी असावी आणि बँक खाते आधार लिंक असावे.
  6. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल

 

  • लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  1. आधार कार्ड
  2. रहिवाशी प्रमाणपत्र
  3. पत्त्याचा पुरावा
  4. वय प्रमाणपत्र
  5. वाहन चालविण्याचा परवाना
  6. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  7. मोबाईल नंबर
  8. पासपोर्ट आकाराचे फोटो
  9. बँक खाते पासबुक
  10. ई-मेल आयडी

 

कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तांकडून लवकरच ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था तयार केली जाईल. बारावी, आयटीआय, ग्रॅजुएशन व पोस्ट ग्रॅजुएशन शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

 

Leave a Comment